‘डब्लूएचओ’च्या कारभारावर जितेंद्र आव्हाडांची टीका

मुंबई –  गेल्या 24 तासांत भारतातील रुग्ण संख्येमध्ये29 हजार 429 नवीन रुग्णांची भर पडली असून, एकूण रुग्णांचे प्रमाण हे झपाट्याने नऊ लाखांच्या दिशेने चालले आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे.

याच मुद्यावरून  जागतिक आरोग्य संघटनेनं ही परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवली आहे. या सर्व मुद्यावर  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेवरच निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की,“सुरूवातीला करोना विषाणू तितका धोकादायक नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि सारखं ते आपलं वक्तव्य बदलत आहेत.” असं म्हणत आव्हाड यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर निशाणा साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.