मुंबई: बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष ! ‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी गत आहे सगळी, असा टोला धनंजय मुंडे यांनी रावसाहेब दानवेंना लगावला.
रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा ‘हेलिकॉप्टरचा पायलट’ असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. या नव्या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.