किरीटांनी ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली मोदींविरोधात आघाडी करावी- मुंडे

मुंबई: भाजपचे ईशान्य मुंबईतील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना पक्षाकडून आज जोरदार धक्का मिळाला आहे. भाजपतर्फे आज जाहीर करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीतून किरीट सोमय्या यांचे नाव वगळण्यात आले असून आता त्यांच्या जागेवर पक्षाकडून मनोज कोटक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मिश्किल टिपणी केली आहे. शिवसेनेच्या हट्टापायी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबलाय. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या स्वप्ननांचाही भाजपने असाच चुराडा केलाय. ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मोदींविरोधात आघाडी करावी आणि मोदींना धडा शिकवावा, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती झाली असली तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपने किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यात येऊ नये, असा आग्रह धरला होता. भाजपने किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारणे हे भाजपचे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने उचलण्यात आलेले सावधगिरीच पाऊल असल्याचं मानलं जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.