पिरंगुट- कोंढूर (ता. मुळशी) येथे सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूलसह अटक केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सागर महादेव चौधरी (वय 27, रा. जांभळी, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते.
दरम्यान गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार कोंढुर येथे आरोपी सागर चौधरी आली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याची अंगझडती घेतली असता कंबरेला एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल ज्याची किंमत अंदाजे किंमत पन्नास हजार रुपये आणि एक जिवंत काडतुस असा एकूण 50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला पौड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात पाच गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी मधील गुन्ह्यात तो सध्या फरार होता.