पिंपरी | पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करणा-यावर गुन्हा दाखल
Updated On:

पिंपरी, (प्रतिनिधी) – पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर करणा-यावर एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चिंचवडगावातील पडवळ आळी येथे करण्यात आली.
हिरालाल कन्हैय्यालाल ठठेरा (वय ४६, रा. साईनाथनगर, दहीसर पूर्व, मुंबई) यांनी मंगळवारी (दि. ३) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी शंकर क्रिष्णा साका (वय ३९, रा. मोरया बिल्डींग, धनेश्वर मंदिराजवळ, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी साका याने कोणत्याही प्रकारची अधिकृत परवाना नसताना व्यापाराच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या कपंनीचे स्वामित्व हक्क असलेल्या विलकॉम ऍम्ब्रॉडरी स्टुडीओ डिझाइन कंपनीच्या सॉफ्टवेअरचा विनापरवाना लॅपटॉपमध्ये भरणा करुन दुकानात पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर केला. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





