Accident News : लग्नाहून परत येताना वऱ्हाडाच्या बसचा भीषण अपघात; ड्रायव्हरची ‘ती’ चूक पडली महागात
हाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात (Accident News) एका तरुणाचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. हा अपघात लग्न समारंभातून परत येत असताना झाला.

Accident News : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात पहाटे झालेल्या भीषण बस अपघातात (Accident News) एका तरुणाचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले आहेत. हा अपघात लग्न समारंभातून परत येत असताना झाला. अपघातग्रस्त (Accident News) बसमध्ये वरातीतील महिला, पुरुष आणि लहान मुलेही होते. सर्वजण साखर झोपेत असतानाच हा अपघात झाला.
अपघात कसा घडला? Accident News
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील चोपा मोहाडी येथील वरखडे कुटुंबातील लग्न सोहळा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी मैकेपार येथे पार पडला. रात्री लग्न पार पडल्यानंतर वरात परत येत असताना पहाटे गोंदिया जवळील कारंजा परिसरात हा अपघात झाला. खाजगी बस चालकाने भरधाव वेगाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरच्या गाडीला धडक बसली आणि चालकाचे बसवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.
नियंत्रण गमावल्यानंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपी जंगलात शिरली. वेगामुळे बसने अनेक झुडपे आणि लहान झाडे तोडली आणि काही अंतरापर्यंत चालत राहिली. शेवटी बस थांबली, पण तोपर्यंत बसच्या समोरील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला होता.
चालक घटनास्थळावरून पसार
अपघातानंतर बस चालकाने बसमधून उडी मारून पळ काढला. परिसरातील लोकांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेतली आणि बसमधील लोकांना खिडकीतून बाहेर काढले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे कारण ओव्हरटेकिंग आणि वेगवान वाहनचालन असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बस चालक फरार असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून चालकाचा शोध घेतला जात आहे.






