AAP MLA Harmit Singh Pathanmajra : पंजाब विधानसभेचे सनौर मतदारसंघाचे आमदार आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते हरमीत सिंह पठाणमाजरा (AAP MLA Harmit Singh Pathanmajra) यांना अत्याचार, फसवणूक आणि आपराधिक धमकी देण्याच्या गंभीर आरोपात मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-शिवपुरी भागातून अटक करण्यात आली आहे. ते मागच्या ७ महिन्यांपासून फरार होता. पटियाला पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री (२४ मार्च) त्यांना पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून त्यांच्या सहकाऱ्यांसह ताब्यात (AAP MLA Harmit Singh Pathanmajra) घेतले आणि बुधवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत पटियाला येथे आणले. प्रकरण काय आहे? सप्टेंबर २०२५ मध्ये झिरकपूर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून पटियाला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आली होती. महिलेच्या आरोपानुसार, हरमीत सिंह पठाणमाजरा यांनी लग्नाचे आमिष दाखवून तिचा लैंगिक शोषण केले, धमक्या दिल्या आणि अश्लील संदेश पाठवले. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ४२० (फसवणूक), ५०६ (आपराधिक धमकी) तसेच नंतर ३७६(२)(n) सारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. AAP MLA Harmit Singh Pathanmajra FIR नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी (२ सप्टेंबर २०२५) पठाणमाजरा फरार झाले. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी हरियाणातील करनाल येथे छापा टाकला असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्यांना ‘प्रोक्लेम्ड ऑफेंडर’ (फरारी आरोपी) घोषित करण्यात आले होते. त्यांनी ऑस्ट्रेलियात पळ काढल्याचीही चर्चा होती, परंतु अलीकडे ते मध्य प्रदेशात असल्याची गोपनीय माहिती पटियाला पोलिसांना मिळाली. पटियाला पोलिसांच्या SSP वरुण शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे हरमीत सिंह पठाणमाजरा यांचा शोध घेतला. ते तीन सहकाऱ्यांसह ग्वाल्हेर-शिवपुरी बायपासवर एका पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीतून जात असताना मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना पटियाला येथे आणण्यात आले असून, न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. कोण आहेत हरमीत सिंह पठाणमाजरा? हरमीत सिंह पठाणमाजरा (AAP MLA Harmit Singh Pathanmajra) हे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत सनौर मतदारसंघातून आम आदमी पक्षाकडून प्रथमच आमदार म्हणून निवडून आले होते. ते पंजाब विधानसभेतील एक चर्चित चेहरा मानले जातात. मात्र, या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पटियाला पोलिसांनी या अटकेची पुष्टी केली असून, आरोपीला न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आणखी काही सहआरोपी असल्यास त्यांचाही शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.