Crime News : अल्पवयीन आदिवासी मुलीची लग्नासाठी विक्री; 6 जणांवर गुन्हा दाखल
भिवंडी येथून एका १५ वर्षीय आदिवासी मुलीचे कथितरित्या अपहरण (Crime News) करून तिला लग्नाचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यात एका व्यक्तीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime News : भिवंडी येथून एका 15 वर्षीय आदिवासी मुलीचे कथितरित्या अपहरण (Crime News) करून तिला लग्नाचे आमिष दाखवून बीड जिल्ह्यात एका व्यक्तीला विकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीचा पती आणि इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहीतीनुसार, अत्यंत गरिबी आणि पालकांचा आधार नसल्याने या पीडित मुलीचे शोषण (Crime News) करण्यात आले. २६ फेब्रुवारी रोजी एका दलालाने आणि त्याच्या साथीदारांनी तिला लग्नाद्वारे चांगले आयुष्य देण्याचे वचन देऊन तिचे कथितरित्या अपहरण केले, मात्र प्रत्यक्षात त्यांनी तिला बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील एका वयस्कर व्यक्तीला विकून टाकले.
२७ फेब्रुवारी रोजी धमक्या देऊन या अल्पवयीन मुलीला एका बेकायदेशीर लग्नासाठी भाग पाडण्यात आले. २७ फेब्रुवारी ते १० मार्च या कालावधीत तिचा पती भाऊसाहेब तांबे याने तिला शेतातील एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केला. तिच्या एका नातेवाईकाने तिला शोधून काढले. तिने तिच्यावर ओढवलेल्या संकटाची कहाणी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पडघा पोलिसांनी मुख्य आरोपी तांबे, मध्यस्थ विलास हिलम आणि इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक (Crime News) करण्यात आलेली नाही.






