Crime News : मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी (Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन पोलीस शिपायांसह त्यांच्या तीन साथीदारांनी एका फॉरेन करन्सी डिलिव्हरी बॉयला अडवून मारहाण करत तब्बल ९ लाख ४५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ही घटना (Crime News) २५ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता जुहू परिसरात घडली. फिर्यादी सुमित आंबेकर (वय ३०, रा. नेहरू रोड, विलेपार्ले पश्चिम) हे वांद्रे येथील ट्रायोफॉरेक्स कंपनीत फॉरेन करन्सी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. सविस्तर माहिती अशी कि, आंबेकर हे नेहमीप्रमाणे कामावर आले असता, कंपनीने त्यांना जुहू येथील कार्यालयात दहा हजार अमेरिकन डॉलर (सुमारे ८ लाख ३० हजार रुपये) डिलिव्हरी करण्यासाठी पाठविले होते. रस्त्यात काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले, जबरदस्तीने गाडीत बसवले आणि मोबाईल फोन हिसकावून घेत मारहाण केली. Crime News गाडीत बसवल्यानंतर आरोपींनी आंबेकर यांच्या खिशातून दहा हजार अमेरिकन डॉलर काढून घेतले. तसेच त्यांना धमकावून मोबाईलचा पासवर्ड घेतला. गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने फिर्यादींची बॅग ताब्यात घेऊन त्यातील १५ हजार रुपये रोख देखील काढून घेतले. आरोपींनी आंबेकर यांना त्यांच्या घरी कोण-कोण आहेत, कंपनी आणि स्टाफबद्दल सविस्तर विचारणा केली. नंतर गाडी बोरिवली युनिटकडे नेण्याची सूचना चालकाला दिली. गाडी पुढे गेल्यानंतर दोघांनी स्वतःचे पोलीस ओळखपत्र दाखवले आणि फिर्यादीला धमकावले, “तुझ्यावर किती केसेस आहेत? आणखी केसेस वाढवायच्या आहेत का?” फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांचा मोबाईल तपासला, कोणाशी संपर्क साधू दिला नाही आणि “तुझ्यावर केस आहे” असे सांगून सतत धमकावले. गुन्हा नोंद या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात जबरी चोरी व इतर संबंधित कलमांखाली गुन्हा (Crime News) नोंदवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सब-इन्स्पेक्टर राहुल प्रभाकर शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला असून, पुढील कारवाईकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.