कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघांना अटक

कामशेत – कामशेत शहरातील मच्छी मार्केट चौकात गुरुवार ( दि. 3) रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलिसांना संशयास्पद आढळलेल्या दोन इसमांची अंगझडती घेतल्यावर त्याच्यापैकी एकाकडे 16 इंची धारधार लोखंडी कोयता सापडला आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी जावेद शब्बीर शेख (वय 34 रा.साई समर्थ कॉलनी, बिजलीनगर, चिंचवड ), आफताब अल्ताफ पिरजादे ( वय 21 रा. साई मंदिराजवळ ओम कॉलनी नं 2 , बिजलीनगर, चिंचवड ) यांना अटक केली आहे.

कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील मच्छी मार्केट चौकात सकाळी सहाच्या सुमारास रात्रीची गस्त संपवून पोलीस हवलदार समीर शेख, पोलीस हवालदार अजय दरेकर हे पोलीस ठाण्यात परत येत असताना पोलिसांना जावेद शब्बीर शेख, आफताब अल्ताफ पिरजादे यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. यावेळी त्यांची अंगझडती घेतल्यावर जावेद शब्बीर शेख याच्याकडे 16 इंची धारधार लोखंडी कोयता सापडला आहे. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.