पिंपरी – रिक्षाच्या भाड्यावरून झालेल्या वादातून चालकाने महिलेला शिवीगाळ करत कानाखाली मारली. ही घटना बुधवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास चांदणी चौक येथे घडली. याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक केली आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर दत्तात्रय माने (वय-42, रा. जय भवानी नगर, कोथरूड) याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. बुधवारी फिर्यादी महिला आरोपीच्या रिक्षामध्ये बसली होती. भाड्यावरूव त्यांच्यामध्ये वाद झाला. यातूनच आरोपीने महिलेला शिवीगाळ करत रिक्षातून खाली उतरविले. महिलेचा हात पिरगळून कानाखाली मारली. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.