पिंपरी – खंडणीचे पैसे दिले नाहीत म्हणून कारवर दगड घातल्याचा प्रकार दापोडी येथे घडली आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशिष देवदास जगताप (वय-28 रा. खडकी) यांनी फिर्याद दिली असून दिनेश आवळे, राकेश आवळे, अनिकेत महाडिक व त्यांचा एक मित्र (अज्ञात) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीकडे मंडपाचे डेकोरेशनची ऑर्डर आली होती. आरोपींनी त्यातून 5 हजार रुपये खंडणी मागितली. त्याला फिर्यादीने विरोध केला. त्यामुळे रागाने आरोपींनी फिर्यादीच्या कारच्या काचेवर दगड घालून नुकसान केले. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.