पिंपरी – आधारकार्ड मागितल्याच्या रागातून पतीने पत्नीला मारहाण केली. हा प्रकार पिंपळे निलख येथे घडला आहे. सांगवी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
सुधाराणी प्रमोदकुमार प्रजापती (वय-35) यांनी फिर्याद दिली असून प्रमोदकुमार प्रजापती (वय-35) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी पतीचे आधारकार्ड मागितले असता त्याचा राग येवून प्रमोदकुमार यांनी फिर्यादी यांना चापट मारली व फिर्यादी यांना जमीनीवर ढकलेले. यामध्ये फिर्यादी यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. यावरून सांगवी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.