कबूतर चोरीच्या संशयावरून तरुणाला मारहाण

पिंपरी – कबूतर चोरील्याच्या संशयावरुन पाच जणांच्या टोळक्‍याने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. ही घटना लांडेवाडी येथे शनिवारी (दि.30) घडली असून भोसरी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. गौतम गिरीष नाईक (वय-19 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी शुभम राऊत (वय-21),रोहन सुर्यवंशी (वय-21),सौरभ घुगे (वय-22), तेजस जाधव (वय-21) सर्व राहणार भोसरी यांना अटक केली असून पाचवा आरोपी हा अल्पवयीन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम हा लांडेवाडी येथे हातगाडीवर कलिंगड विकण्याचा व्यवसाय करतो. आरोपी यांचे एक महिन्यापूर्वी कबूतर चोरीला गेले होते. यावरून आरोपी आणि फियार्दी यांच्यात वाद झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून गौरव याला आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्‍याने व सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये गौतम हा गंभीर जखमी झाला असून भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.