दुचाकीवरील चोरट्याने महिलेचे मंगळसूत्र पळवले
Updated On:
पिंपरी – दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्याने रस्त्यावर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयाचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना शुक्रवार दि. 24 मे रोजी मोशी येथील टायगर गुहा परिसरात घडली. या प्रकरणी किरण भारत सस्ते (वय-25 रा. टायगर गुहा, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एमएच 14 /जीटी/ 9044) या दुचाकीवरील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी किरण सस्ते या शुक्रवारी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मोशी येथील टायगर गुहा परिसरात नाशिक-पुणे हायवेवर थांबलेल्या होत्या. त्यावेळी, एमएच 14/जीटी/9044 या क्रमांकाच्या दुचाकीवरुन आलेल्या अनोळखी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने चोरुन नेले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बांबळे हे करीत आहेत.
टॅग्स:




