रावण साम्राज्य टोळीतील सराईतास पिस्तुलासह अटक

पिंपरी – शहरात दहशत पसरविणाऱ्या व कुख्यात असलेल्या रावण साम्राज्य टोळीतील सराईत गुन्हेगारास वाकड पोलिसांनी पिस्तुल व जिवंत काडतुसासह अटक केली आहे. विक्रांत सुभाष कांबळे (वय 20, रा. कासार आंबोली, मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या सूचनेनुसार गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी तपास अधिकारी हरिश माने व कर्मचारी वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत बांगर यांना माहिती मिळाली की, कस्पटेवस्ती येथून हिंजवडीकडे बुलेटवरुन निघालेल्या एका तरुणाकडे पिस्तुला सारखे हत्यार आहे.

पोलिसांनी सापळा रचून विक्रांत कांबळेला पकडले. त्याच्याकडून 11 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. चौकशी केल्यानंतर कांबळे रावण साम्राज्य टोळीतील गुंड असल्याचे निष्पन्न झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×