प्रवासी उतरवून रिक्षा चालकाला मारहाण
Updated On:
पिंपरी – प्रवासी घेऊन चाललेल्या रिक्षा अडवून आणि रिक्षातील प्रवाशांना खाली उतरवून रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवार दि. 12 मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. गोपीनाथ धोंडीबा आढाव (वय-45) असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. त्याने हिंजवडी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन रोहिदास गोपीनाथ पारखी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोपीनाथ हे हिंजवडी येथील कोयतेवस्ती चौकातून रिक्षामध्ये प्रवासी घेऊन जात असताना आरोपीने त्यांची रिक्षा अडवली व प्रवाशांना खाली उतरवले. रिक्षाचालक गोपीनाथ यांना येथे धंदा करायचा नाही, असे धमकावत लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली.





