पिंपरी – पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत “फडणवीस गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. याप्रकरणी तीस ते पस्तीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष लांडगे, सौरभ लांडगे, मारुती लांडगे, प्रशांत पवार, संजय उदवंत, राजेंद्र हरिश्चंद्र बिराजदार, नाना लांडगे, रणू बिराजदार, डंगू शिंदे, परशुराम पवार, अमर बिराजदार, अमित गुप्ता, शेखर गव्हाणे, चिम्या लांडगे (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी) आणि इतर पंधरा ते वीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. या प्रकरणी पोलीस शिपाई सुरेश वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
भोसरी येथील पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. फडणवीस उद्घाटनासाठी कार्यक्रम स्थळी आले असता आरोपींनी काळे झेंडे आणि परत घेऊन फडणवीस गो बॅक, भ्रष्टाचारी पिंपरी-चिंचवड भाजपा अशा प्रकारचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. आरोपींनी घोषणा देत शांततेचा भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.