#Crime : कोंढव्यातील खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींना अटक

पुणे(प्रतिनिधी) – कोंढवा येथील खूनाच्या गुन्हयातील मुख्य आरोपींना खंडणी विरोधी पथक 2 कडुन अटक करण्यात आली. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
अभिषेक दशरथ पवार (19, धंदा स्लायडींग,रा. शिवनेरी नगर कोंढवा बु. ) अजय नरसिंग गरड (19, रा. येवलेवाडी, कोंढवा ), व विधी संघर्षित बालक अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कार्तिक अनिल जाधव याचा दि.12 ऑगस्ट रोजी येवलेवाडी येथे डोक्यावर, हातावर, कानावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आला होता. खुन केल्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार फरार झालेले होते.
या गुन्हयाचा समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे यांना खबर मिळाली की, सदरचे गुन्ह्यातील आरोपी अभिषेक पवार व त्याचे साथीदार हे वाघोली चौक येथे येणार आहेत. त्यानूसार सापळा रचून तिघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुके, संग्राम शिनगारे, महेश साळुके, प्रविण पडवळ, विजय गुरव, संपत औचरे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांनी केलेली आहे.





