#HardikPandya : हार्दिक पंड्याचे कोट्यवधींचे घड्याळ
Updated On:

दुबई – भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या आयपीएल स्पर्धेच्या तयारीसाठी दुबईत आहे. पंड्या याला महागडी घड्याळे तसेच महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याने स्पर्धेसाठी येथे दाखल झाल्यावर सराव सत्र पार पडल्यावर दुबई सफरीचा आनंद घेतला.
त्यात शॉपिंग करताना त्याने तब्बल पाच कोटी इतक्या प्रचंड रकमेचे घड्याळ खरेदी केले. हे घड्याळ आपल्या मनगटावर लावून पंड्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
संपूर्ण प्लॅटिनमचे हे घड्याळ भारतीय रुपयांमध्ये तब्बल पाच कोटी रुपयांचे असल्याचे बोलले जात आहे. आता त्याच्या पोस्टला लाखो चाहत्यांनी लाईक्स केले आहे.





