Cricket World Cup – रवींद्र जडेजा (Veendra Jadeja) भारतीय संघाला लाभलेला अफलातून अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र, डीआरएस घेण्यासाठी तो प्रत्येक वेळी हट्ट करतो, असे गमतीशीर विधान भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) केले आहे.
अनेक लढतींत मी पाहिीले आहे की जडेजा गोलंदाजी करताना एखाद्या फलंदाजाच्या बॅटच्या अगदी जवळून चेंडू गेला असेल किंवा त्याच्या पॅडला चेंडू लागला असेल तर जडेजा माझ्याकडे येऊन हा फलंदाज बाद आहे तू डीआरएस घे असा हट्ट करतो.
त्याला प्रत्येक वेळी फलंदाज बाद आहे असेच वाटते; परंतु त्यातील अनेक डीआरएस आमच्या बाजूने निकाल देतात हे देखील सत्य आहे. मात्र, जडेजा स्वतःच्या गोलंदाजीवर डीआरएस घेतना सतत माझ्याकडे येऊन हट्ट करतो, असेही रोहितने सांगितले.