Cricket News : स्मृती-शेफालीने रचला इतिहास ! ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली जोडी
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक आणि धडाकेबाज सलामीची जोडी (Cricket News) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी आपल्या वादळी फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे.

Cricket News : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक आणि धडाकेबाज सलामीची जोडी (Cricket News) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी आपल्या वादळी फलंदाजीने जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण केली आहे.
नेदरलँड्सविरुद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात या सलामीच्या जोडीने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात भारतीय डावाची (Cricket News) सुरुवात करताना स्मृती आणि शेफालीने पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची तुफानी भागीदारी रचली.
यामध्ये स्मृती मंधानाने अवघ्या ४७ चेंडूंत ७४ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर ‘लेडी सहवाग’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेफाली वर्माने ३८ चेंडूंत ५५ धावा कुटत नेदरलँड्सच्या गोलंदाजीची दाणादाण उडवली.
या सामन्यातील ११५ धावांच्या धमाकेदार भागीदारीच्या जोरावर स्मृती आणि शेफालीने पुरुष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात कधीही न झालेला एक महाविक्रम आपल्या नावावर कोरला आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये (T20I) भागीदार म्हणून ३५०० पेक्षा जास्त धावा पूर्ण करणारी ही जगातील पहिलीच जोडी ठरली आहे. आजवर क्रिकेट जगतातील कोणत्याही पुरुष किंवा महिला जोडीला हा टप्पा ओलांडता आलेला नाही.
या दोन्ही स्टार खेळाडूंनी मिळून आतापर्यंत (Cricket News) महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५१९ धावांची भागीदारी केली असून, या ऐतिहासिक कामगिरीमुळे या भारतीय जोडीचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे.
या सामन्यात केवळ भागीदारीचाच नाही, तर भारताची उपकर्णधार स्मृती मंधाना हिने एक वैयक्तिक जागतिक विक्रमही प्रस्थापित केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ६०० पेक्षा जास्त बाऊंड्री (चौकार) मारणारी ती जगातील एकमेव आणि पहिलीच फलंदाज ठरली आहे. स्मृतीच्या नावावर आता १६२ सामन्यांमध्ये ६०३ चौकारांची नोंद झाली आहे.
या बाबतीत तिने न्यूझीलंडच्या दिग्गज सुझी बेट्स हिला (५२१ चौकार) खूप मागे सोडले आहे. विशेष बाब (Cricket News) म्हणजे, पुरुष क्रिकेटचा विचार केला तर तिथे सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या बाबर आझमच्या (४७७ चौकार) नावावर आहे, परंतु स्मृती मंधाना या विक्रमात बाबर आझमच्याही कित्येक पटीने पुढे निघून गेली आहे. स्मृती आणि शेफालीच्या या अद्भूत कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटची मान जगभरात उंचावली आहे.
T20I सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज
603* – स्मृति मंधाना (162)
521 – सूज़ी बेट्स (176)
493 – चमारी अथापथु (156)
477 – बाबर आज़म (136)
459 – बेथ मूनी (114)
449 – पॉल स्टर्लिंग (160)
435 – डैनी वायट-हॉज (161)
435 – गैबी लुईस (114)
432 – हेले मैथ्यूज (122)
409 – एलिसा हीली (143)






