हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाची विजयी सलामी

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियम लीग स्पर्धा

पुणे – शुभम कोठारीने केलेल्या भेदक गोलंदाजीसह ओंकार खाटपेच्या फलंदाजीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी संघाने युनायटेड क्रिकेट क्‍लबचा पराभव करत येथे होत असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियम लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.

व्हिजन क्रिकेट मैदान येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना युनायटेड क्रिकेट क्‍लबचा डाव 40.1षटकात 237धावावर संपुष्टात आला. यात अमेय सोमणने अफलातून फलंदाजी करताना 94 चेंडूत 131धावांची खेळी केली. अमेयला अजित गव्हाणे 35, निखिल कारले 30यांनी धावा करून सुरेख साथ दिली. हेमंत पाटील क्रिकेट अकादमीकडून शुभम कोठारी 4-26, अविनाश शिंदे 3-18, शुभम उपाध्याय 2-37 यांनी सुरेख गोलंदाजी केली.
237 धावांचे आव्हान हेमंत पाटील क्रिकेट अकादमीने 39.5 षटकात 5बाद 239 धावा करून पूर्ण केले. यात ओंकार खाटपे 96, अवधूत दांडेकर 48, अविनाश शिंदे नाबाद 28, किर्तिराज वाडेकर 24यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिली. सामन्याचा मानकरी शुभम कोठारी ठरला.

सविस्तर निकाल: साखळी फेरी:

युनायटेड क्रिकेट क्‍लब: 40.1षटकात सर्वबाद 237धावा(अमेय सोमण 131(94), अजित गव्हाणे 35(37), निखिल कारले 30(30), शुभम कोठारी 4-26, अविनाश शिंदे 3-18, शुभम उपाध्याय 2-37) पराभूत वि.हेमंत पाटील क्रिकेट अकादमी: 39.5 षटकात 5बाद 239 धावा(ओंकार खाटपे 96(103), अवधूत दांडेकर 48(64), अविनाश शिंदे नाबाद 28(24), किर्तिराज वाडेकर 24(32), तरुण वलनी 3-42);सामनावीर-शुभम कोठारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.