– अमित डोंगरे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत हल्ली नवा पायंडा पडू लागला आहे. वेळेत षटके पूर्ण झाली नाहीत की सामनाधिकारी प्रचं रकमेचा दंड त्या संघाच्या कर्णधाराला करतात. यापासून वाचण्यासाठीच आता काही खेळाडू हुशारी करू लागल्याचे दिसत आहे. एका सामन्यात पहिल्यांदाच वेळेत षटके पूर्ण झाजी नाहीत तर कर्णधाराला 12 लाख रुपयांचा देड ठोठावला जात आहे. दुसऱ्यांदा तशीच चुक घडली तर दंडाची रक्कम दुप्पट होते. त्यानंतरही अशा चुका घडल्या तर खेळाडू घरी काय रिकामा हंडा घेऊन जाणार. मग यापासून वाचण्यासाठी कर्णधार तसेच संघ व्यवस्थापन नवी शक्कल लढवताना दिसतात. एका सामन्यात असा दंड झाला तर लगेच विश्रांतीच्या, राखीव खेळाडूच्या किंवा इम्पॅक्ट खेळाडूच्या नावाखाली किंवा आणखी मोठ्या दंड रकमेतून वाचण्यासाठी एका सामन्यातून विश्रांती घ्यायची व अन्य खेळाडूकडे नेतृत्व सोपवायचे. हा सामना संपला की पुन्हा संघात पुनरागमन करायचे. हा फंडा विराट कोहली, हार्दीक पंड्या, रोहित शर्मा, पाफ डुप्लेसी, लोकेश राहुल, नितिश राणा यांनी यंदाच्या स्पर्धेत वापरला आहे. मुळातच 90 मिनिटे 20 षटकांसाठी दिलेली असतात. त्यात प्रत्येक षटकासाठी 4 मिनिटे, ड्रींक्स ब्रेकसाठी प्रत्येक डावात 10 मिनिटे अशी 90 मिनिटे असतात. स्ट्रॅटेजीक टाईम आऊटची 2ः30 मिनिटे यात धरलेली नसतात तसेच दुखापती किंव अन्य नैसर्गिक गोष्टींसाठीचा वेळही अतिरीक्त समजला जातो. साधारणपणे कोणत्याही सामन्यात वेगवान गोलंदाज 3ः30 मिनिटांत फार काही वेगळे घडले नाही, प्रेक्षकांमध्ये चेंडू हरवला नाही तर घेतो. फिरकी गोलंदाज तर आडीच मिनिटांत फारतर तीन मिनिटांत एक षटक पूर्ण करतो. हे कसोटी, एकदिवसीय व टी-20 या तीनही प्रकारात दिसते. मग आयपीएल काय वेगळे आहे आहे का. आयपीएल समिती, बीसीसीआय, पंच व सामनाधिकारी यांनी कर्णधारांच्या या क्लृप्त्यांवर नियंत्रण कसे आणता येइल याचा अभ्यास करावा अन्यथा हाच पायंडा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पडण्याचा धोका आहे.