क्रिकेट प्रशिक्षकांच्या मुलाखती आज होणार
Updated On:
मुंबई –मुंबई क्रिकेट संघटनेने प्राथमिक निवड केलेल्या प्रशिक्षकांच्या आज (बुधवार) मुलाखती होणार आहेत. मुंबईच्या रणजी संघासह विविध वयोगटासाठी प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाणार असून क्रिकेट सुधारणा समितीकडून या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
24 जणांची प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून त्यात माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सलिल अंकोला, सुलक्षण कुलकर्णी व राजू कुलकर्णी यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्या आरोग्याच्या कारणाने मुलाखतीसाठी राजू कुलकर्णी यात सहभागी होणार नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनेमुळे मला या मुलाखतीत सहभागी होत येणार नसल्याचे त्यांनी संघटनेला कळवले आहे.





