Cricket Canada President Arvinder Khosa Firing : आंतरराष्ट्रीय क्रीडा वर्तुळातून एक धक्कादायक आणि अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. ‘क्रिकेट कॅनडा’चे अध्यक्ष अरविंदर खोसा (Arvind Khosa ) यांच्या कॅनडातील निवासस्थानी बुधवारी (२० मे) पहाटेच्या सुमारास अज्ञातांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे शहरात असलेल्या न्यूटन भागातील त्यांच्या घरावर हा हल्ला झाला. स्वतः अरविंदर खोसा यांनी या गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला असून, हा संपूर्ण प्रकार खंडणी वसुलीशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Cricket President Firing) पहाटे ४.४० वाजता गोळ्यांचा थरार; भिंतींवर ५ खुणा! (Cricket President Firing) सरे शहरातील ज्या भागात हा गोळीबार झाला, तिथे भारतीय वंशाचे आणि विशेषतः पंजाबी लोक मोठ्या संख्येने राहतात. बुधवारी पहाटे ४:४० च्या सुमारास संपूर्ण परिसर झोपेत असताना अचानक गोळ्यांचा आवाज घुमला. हल्लेखोरांनी केलेल्या या गोळीबारात खोसा यांच्या घराचे दरवाजे, खिडक्या आणि बाहेरील भिंतींवर किमान ५ गोळ्यांच्या खुणा आढळून आल्या आहेत. हल्ल्याच्या वेळी अरविंदर खोसा यांचे संपूर्ण कुटुंब घरात गाढ झोपेत होते. सुदैवाने, या भीषण हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत. माहिती मिळताच सरे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. Canada Cricket Shooting Scandal: Sport Failing In North America? Cricket Canada is once again under the spotlight after the home of newly elected president Arvinder Khosa was targeted in a suspected extortion-related shooting. pic.twitter.com/jtzFekDuqw — Firstpost (@firstpost) May 21, 2026 मॅच फिक्सिंग आणि बिश्नोई गँगचा संशयास्पद अँगल? (Cricket President Firing) विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वीच क्रिकेट कॅनडामध्ये भ्रष्टाचार, संघटित गुन्हेगारी आणि मॅच-फिक्सिंगच्या गंभीर आरोपांनंतर एक मोठी अंतर्गत चौकशी करण्यात आली होती. क्रिकेट ब्रिटिश कोलंबियाचे विद्यमान अध्यक्ष असलेले अरविंदर खोसा हे देखील या चौकशी प्रक्रियेत सक्रिय होते. हेही वाचा – Hardik Pandya Fined : हार्दिक पंड्याला बीसीसीआयचा मोठा दणका! भर मैदानातील ‘त्या’ कृतीसाठी केली कडक कारवाई तपासात असेही समोर आले आहे की, अरविंदर खोसा यांचे नाव एका स्थानिक खेळाडूशी जोडले गेले होते. या खेळाडूने स्वतःला कुख्यात ‘बिश्नोई गँग’चा (Bishnoi Gang) सदस्य असल्याचे सांगत २०२५ मध्ये कॅनेडियन राष्ट्रीय संघाच्या एका खेळाडूला धमकी दिल्याचा आरोप होता. खोसा यांनी हे सर्व आरोप आधीच फेटाळून लावले असले, तरी या चौकशीच्या काही दिवसांतच त्यांच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांचा हात असण्याची शक्यता बळावली आहे. (Cricket President Firing)