Bachchu Kadu Vs Ravi Rana | प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात फिनले मिलवरून वाद सुरू झाले आहेत. कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अचलपूर येथील फिनले मिल सुरू केली. मात्र हा फिनले मिल उद्योग गेल्या कित्येक वर्षापासून बंद पडला आहे. आता अचलपूर येथील फिनले मिलच्या पुनर्स्थापनेसाठी राज्य शासनाने २० कोटींचा निधी देण्याचे मान्य केले. या श्रेयवादावरून अचलपूरचे आमदार बच्चू कडू व बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे. या मिलवरून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्याचे पडसाद अमरावती जिल्हा नियोजन बैठकित उमटल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच ही खडाजंगी रंगल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अमरावती जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. Bachchu Kadu Vs Ravi Rana | मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक पार पडली होती. या मिलसाठी यापूर्वी नवनीत राणा यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला व बैठकी घेतल्याचे राणा म्हणाले. Bachchu Kadu Vs Ravi Rana | बच्चू कडू यांचा राणा यांच्यावर हल्लाबोल बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी राणा यांच्यावर हल्लाबोल केला. “स्वत:च्या मतदारसंघातील विजय मिल बंद आणि गोल मिल बंद झाले आहे. तिथले कामगार उपाशी मरत असून त्यांना घर, जागा मिळाले नाही. तिथे हे राणा दाम्पत्य काही करु शकले नाहीत. खासदार असूनसुद्धा नवनीत राणा यांनी कामगारांसाठी लोकसभेत एक प्रश्न सरकारला विचारला नाही.” “केंद्राचं मिल सुरु करण्याबाबत धोरण आहे. हा पूर्ण विषय केंद्राच्या अधीन आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: बैठकीत हा विषय केंद्राचा असल्यामुळे तिथून विषय सोडवू असं आश्वासन दिलं आहे. पण तरीही माझ्या डोक्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न केले जात आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. तुम्ही खासदार होत्या, तुमचं सरकार होतं. मिल काँग्रेसच्या काळात सुरु झाली आणि भाजपच्या काळात बंद झाली याची लाज वाटली पाहिजे,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली. रवी राणा यांचे प्रत्युत्तर आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिले आहे. “फिनले मिल बंद पडली तेव्हा अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ आली. तेव्हा माजी खासदार नवनीत राणा यांनी ती फिनले मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यासोबतच आता काही दिवसांआधी मी त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत मंत्रालयात बैठक झाली आणि फिनले मिल सुरू करण्याचा निर्णय झाला.” “मी आणि नवनीत राणा यांनी केलेल्या कामांमुळे राज्य सरकारने मिल चालवण्यासाठी घेण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र पाठवलं. पण आज बच्चू कडू सांगतात की ते काम मी करून आणले. माझं त्यांना आवाहन आहे की, त्यांनी केलेला पाठपुरावा आणि नवनीत राणा यांनी केलेला पाठपुरावा आणि मी केलेला पाठपुरावा आणावा. मी जिथे म्हणाल तिथे बसायला तयार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे”, असे वी राणा यांनी बच्चू कडू यांना प्रत्युत्तर दिले. हेही वाचा: Paris Olympics 2024 (Wrestling) : पदकांची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी भारतीय कुस्तीपटू सज्ज, विनेश पदकाची प्रबळ दावेदार…