“पीडित आणि गुन्हेगार यांच्यात समानता निर्माण”; ट्रम्प यांच्या भूमिकेने शशी थरूर संतापले, ४ मुद्द्यांद्वारे व्यक्त केली नाराजी

Shashi Tharoor on America | भारत आणि पाकिस्तानच्या युद्धविरामाची घोषणा १० मे रोजी करण्यात आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धविरामाची घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षांनी यावर नाराजी व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच ट्रम्प यांनी काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. यावर आता काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर चार मुद्द्यांमध्ये ट्रम्प यांच्या टिप्पणींना भारतासाठी निराशाजनक ठरवले आहे.
शशी थरूर यांनी सांगितले की, “ट्रम्प यांची टिप्पणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात चुकीची तुलना दर्शवते. ते गुन्हेगार आणि पीडित व्यक्तीला एकच दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते दक्षिण आशियाई देशांच्या अंतर्गत मुद्द्यांवर अनावश्यक भाष्य करत आहेत. आपल्या विधानांद्वारे ते भारत आणि पाकिस्तानला एकाच तराजूत चुकीच्या पद्धतीने तोलण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांनी वाटाघाटींद्वारे पाकिस्तानला ती वैधता दिली आहे, जी त्याने स्वतः कधीच मिळवली नाही,” अशी प्रतिक्रिया थरुर यांनी दिली. Shashi Tharoor on America |
Mr Trump’s post is disappointing for India in four important ways: First, it implies a false equivalence between the victim and the perpetrator, and seemingly overlooks the US’ own past unwavering stance against Pakistan’s well-documented links to cross-border terrorism. Second,… https://t.co/Za5cvwq82M
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 12, 2025
4 मुद्द्यांवर व्यक्त केली नाराजी
यासोबतच थरुर यांनी ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या पोस्टबाबत 4 मुद्द्यांद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “ट्रम्प यांची पोस्ट चार महत्त्वाच्या बाबतीत भारतासाठी निराशाजनक आहे. पहिले म्हणजे त्यांची पोस्ट पीडित आणि गुन्हेगार यांच्यात समानता निर्माण करते आणि सीमापार दहशतवादाशी पाकिस्तानच्या संबंधांविरुद्ध अमेरिकेच्या पूर्वीच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करते. दुसरे म्हणजे, भारत कधीही दहशतवाद्यांच्या डोक्यावर बंदूक ठेवून वाटाघाटी करणार नाही.” Shashi Tharoor on America |
ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याबद्दल भाष्य केले होते, त्यानंतर वाद आणखी वाढला. याबाबत शशी थरुर म्हणाले की, “तिसरे म्हणजे काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे चुकीचे आहे, दहशतवाद्यांनाही हेच हवे आहे. हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे, यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये. भारताने पाकिस्तानसोबतच्या समस्यांवर कधीही कोणत्याही परदेशी देशाकडून मध्यस्थीची मागणी केलेली नाही आणि करण्याची शक्यताही नाही. चौथे म्हणजे जागतिक नेत्यांना त्यांचा भारत दौरा पाकिस्तान दौऱ्यासोबत एकत्र करू नयेत, असे सांगण्यात आले आहे. 2000 मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटनपासून याची सुरुवात झाली आहे, “अशी प्रतिक्रिया शशी थरुर यांनी दिली. Shashi Tharoor on America |
हेही वाचा :
अमृतसरध्ये विषारी दारू पिऊन १४ जणांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?





