पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने म्हाळुंगे येथे 1 हजार 408 बेड्सची क्षमता असलेले “कोविड केअर सेंटर’ म्हाडाच्या सोसायटीमध्ये सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
या सेंटरचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, अति. सीईओ भारत शेडगे, जिल्हा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यासह अधिकारी उपस्थित होते.सुसज्ज असे हे सेंटर असून, येथे संशयिताचे नमुने घेतले जाणार असून, त्यासाठी पुण्यात जाण्याची आवश्यकता नाही. हे सर्व नमुने एनआयव्हीकडे पाठवले जातील.