महानगरपालिका आरोग्य प्रशासनाचा निर्णय
पुणे – कमी रुग्णसंख्या असलेले कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष बंद करण्याचा निर्णय आरोग्य प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामध्ये चार केअर सेंटर असून, नऊ विलगीकरण कक्ष आहेत.
सध्या महापालिका कार्यक्षेत्रात 11 ठिकाणी कोविड केअर सेंटर्स कार्यान्वित असून 20 ठिकाणी आणखी सेंटर्स प्रस्तावित आहेत. तसेच 16 ठिकाणी विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. याशिवाय दोन जम्बो कोविड हॉस्पिटलही उभारण्यात आले आहे. मात्र, शहरातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
या पार्श्वभूमीवर या सेंटर्स आणि विलगीकरण कक्षाची देखभाल दुरुस्ती खर्च, मनुष्यबळाची संख्या आणि खर्च या सगळ्याचा विचार करता काही कक्ष बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सेंटर्सची भविष्यात पुनश्च आवश्यकता पडल्यास त्या इमारती त्वरित ताब्यातही घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
बंद करण्यात येणारे कोविड सेंटर…
– सिंहगड इन्स्टिट्यूट, वडगाव बुद्रुक
– गर्ल्स हॉस्टेल ए.सी.
– ट्रिनिटी कॉलेज वसतिगृह, कोंढवा
– निकमार, बालेवाडी
– मराठवाडा इंजिनीअरींग कॉलेज, कर्वेनगर
बंद करायचे विलगीकरण कक्ष
– आनंद ऋषीजी शाळा, नगररस्ता
– जीपीपी शिवाजीनगर
– आयटीआय, औंध
– पोकळे शाळा, धायरी
– मुक्तांगण शाळा
– अंध-अपंग संस्था, वानवडी
– एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर
– टिळेकरनगर हॉस्टेल, कोंढवा
– हाजी गुलाम आझम एज्युकेशन ट्रस्ट, कॅम्प
बंद करायचे प्रस्तावित कोविड केअर सेंटर
– कमिन्स कॉलेज वसतिगृह, वारजे
– कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर
– एमआयटी, कोथरूड
– फर्ग्युसन कॉलेज
– पुणे विद्यापीठ सभागृह
– नंदन ऍक्युरा, बाणेर
– ग्लायडिंग सेंटर, हडपसर
– भारती विद्यापीठ, कोथरूड
– सिम्बायोसिस वसतिगृह, विमाननगर
– जेएसपीएम, हडपसर
– सीओईपी लेडीज हॉस्टेल, शिवाजीनगर
– संत ज्ञानेश्वर वसतिगृह, येरवडा
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, येरवडा