म्हाडाच्या इमारतीमधील कोव्हीड केअर सेंटर सुरु, ५ तज्ञ डॉक्टरांसह ५० जणांचा स्टाफ उपलब्ध

Updated On:

राजगुरूनगर(प्रतिनिधी)-तालुक्यासह जुन्नर आंबेगाव, शिरूर तालुक्यात करोना रुग्णाच्या संख्येत वाढ होता असल्याने चाकण येथील म्हाडाच्या इमारतीमधील कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले असून त्यासाठी ५ तज्ञ डॉक्टरांसह ५० जणांचा स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर चाकण येथील २ खाजगी हॉस्पिटल मध्ये १०० पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार  करण्यासाठी करार करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

खेड तालुक्यात १९ करोना पॉझिटिव्ह झाले असून त्यांच्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबई पुणे आदी बाहेरगावरून आलेल्या नागरिकांमध्ये करूणा पॉझिटिव्ह चे प्रमाण असल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात असून यापुढील काळात करण्यात येणाऱ्या उपाययोजना बाबत प्रांताधिकारी यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची व राजकीय पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली होती त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेत तालुक्यातील करोना विषाणू संसर्ग बाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना व माहिती दिली

प्रांताधिकारी तेली म्हणाले, खेड तालुक्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तालुक्यात सध्या करूणा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संख्येत वाढ होत असल्याने म्हाळुंगे येथील कोव्हीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे सुरुवातील १०० रुग्णांची येथे सोय करण्यात येणार आहे. स्वब टेस्ट व करोना संशयित संशयित व्यक्ती येथे ठेवण्यात येणार आहेत. खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील व्यक्तींना या ठिकाणी स्वब टेस्ट व कोरंटाईन केले जाणार आहे.त्यानंतर हळूहळू येथील केअर सेंटरमध्ये ४०० पर्यंत रुग्ण ठेवण्याची व्यवथा केली जाणार आहे.

म्हाडाच्या इमारतीत सुरु करण्यात आलेल्या कोव्हीड केवळ सेंटर मध्ये तालुक्यातील १० प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५ तज्ज्ञ डॉक्टर, १० समुदाय वैद्यकीय अधिकारी, १४ नर्सेस, ४ औषध निर्माण तंत्रज्ञ, ५ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा ऑपरेटर व इतर अशा ५० स्टाफ ला मान्यता मिळाली असून अनेकजण प्रत्यक्षात रुजू झाले आहेत. व इतर याबरोबरच भविष्यात पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढली तर चाकण येथील दोन खाजगी रुग्णालयात १०० आयसोल्युशन वार्ड ची व्यवस्था करण्यात आली असून या रुग्णालयाशी करार केला आहे.त्याचे अधिग्रहण करण्यात आले आहे.यासाठी स्वता संजय तेली यांनी पाठपुरावा केला होता. कोव्हीड संशयित व पॉझिटिव्ह रुग्णाची ने आन करण्यासाठी ३ ऍम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
रुग्ण असलेल्या तालुक्यातील ७ ठिकाणी कन्टोमेंट झोन जाहीर केले आहेत यात पाईट, कडूस, राक्षेवाडी,झित्राइमळा, कुरकुंडी पापळवाडी, वडगाव न खेड, या गावाचा समावेश आहे. लॉकडाऊन झाल्यानंतर सुमारे ३२ हजार नागरिक तालुक्यात विविध भागातून आले होते त्यापैकी सुमारे २५ हजार व्यक्तीचा कोरंटाईन अवधी संपला आहे.  मात्र चौथ्या लॉकडाऊन मध्ये  तालुक्यात मुबई सह इतर ठिकाणावरून ८५६१ ग्रामीण,४७२ राजगुरूनगर नगर परिषद, १९७२ चाकण नगर परिषद, व २२६ आळंदी नगर परिषद हद्दीत नागरिक आले आहेत. त्यांच्यापासून भविष्यात धोका आहे म्हणून त्यांच्यावर स्थानिक प्रशासन लक्ष ठेवून आहे. त्यापैकी १३८१ जणांना कोरंटाईन केले आहे.

१५ जून पर्यंत बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीपासून कोव्हीडची लागण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्यावर लक्ष आहे. बाहेरगावरून आलेल्या व्यक्ती १८८ कलमाचे भंग करीत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.  दरम्यान तालुक्यातील सर्व आस्थापना सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याने त्यामध्ये आलेल्या सर्वांची नोंदणी डिजिटल बुक मध्ये ठेवण्याचे आदेश तालुक्यातील आळंदी, चाकण राजगुरूनगर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व खेड पंच्यात समितीचे गटविकास अधिकारी याना देण्यात आले आहेत. संस्थात्मक   विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणाऱ्यांसाठी काही ठिकाणी कम्युनिटी किचन द्वारे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Chakan News: नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! मुसळधार पावसाने घरांवर अन् वीज तारांवर कोसळल्या फांद्या

2026-07-06 04:00:39

Chakan News: नगरपरिषदेचा निष्काळजीपणा! मुसळधार पावसाने घरांवर अन् वीज तारांवर कोसळल्या फांद्या

MHADA News : मुंबईत 82 इमारती अत्यंत धोकादायक; म्हाडाने केले जाहीर

2026-05-30 19:29:24

MHADA News : मुंबईत 82 इमारती अत्यंत धोकादायक; म्हाडाने केले जाहीर

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

2026-05-17 19:03:58

Jayant Patil : आता आपोआपच लॉकडाऊन होईल; जयंत पाटलांची सरकारवर टीका

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

2026-05-02 18:27:43

Sanjay Raut : उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला; संजय राऊतांनी लगावला टोला

Slab Collapse : काळजाचा थरकाप! चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू; कंत्राटदाराचे दुर्लक्ष नडले

2026-04-04 02:30:35

Slab Collapse : काळजाचा थरकाप! चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू; कंत्राटदाराचे दुर्लक्ष नडले