वाॅशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत ट्रम्प म्हणतात की, कोरोनाची बाधा होणं हा देवाचा आशिर्वाद आहे. कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याशी सामना करता येणाऱ्या औषधांची माहिती झाल्याचे त्यांनी सागितले.
A MESSAGE FROM THE PRESIDENT! pic.twitter.com/uhLIcknAjT
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 7, 2020
ट्रम्प यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांच्यावर आता व्हाइट हाऊसमध्येच उपचार सुरू आहेत. व्हाइट हाऊसमध्ये आल्यावर त्यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला.
त्यांनी रूग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराचे कौतुक केले आहे. तसेच सर्व अमेरिकन नागरिंकानाही कोरोनावरील औषधे मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांनी कोरोना आजारावर केलेल्या पोस्टवर फेसबुक आणि ट्विटरने कारवाई केलीय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोरोनाचा आजार हा तापाच्या आजारापेक्षाही कमी धोका असलेला आजार असल्याचा दावा करणारी पोस्ट केली होती.
ही पोस्ट चुकीची असल्याची म्हणत सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मने चुकीची माहिती असल्याच्या श्रेणीत टाकली होती.