Vijay Vadettiwar : राज्यात पहिल्या टप्प्यातील २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतदानात मोठा गोंधळ झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. यापैकी उर्वरित २४ नगरपरिषदांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, त्यानंतर २१ डिसेंबर रोजी एकत्रितपणे निकाल जाहीर करण्यात येणार आहे, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने घेतला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वेाच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सर्वेाच्च न्यायालयाने निर्णय कायम ठेवला आहे. खरंतर २ डिसेंबरला मतदान झाल्यानंर ईव्हीएम मशिन स्ट्राँग रुपमध्ये ठेण्यात आल्या आहेत. याासठी चोख पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला असून, २४ तास सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. पण अशातच ईव्हीएमसाठीची सुरक्षा अपुरी पडत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत बीड नाही तर चंद्रपूरमध्येही संतप्त मतदाराने रोष व्यक्त करत थेट ईव्हीएम फोडल्याची घटना घडली. दुसरीकडे सांगलीच्या आष्टा नगरपरिषदेत एकूण मतदानापेक्षा तब्बल 2 हजार मतं अतिरिक्त झाल्यामुळे नागरिकांचा असंतोष उफाळून आला. या आणि अशा अनेक घटनांमुळे पुन्हा एकदा ईव्हीएमबाबतच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप एका बाजूला ईव्हीएमच्या सुरक्षेवरून विरोधकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यातच निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच जाहीर करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. अशताच काँग्रेस नेते विजय वडट्टेवार यांनी गंभीर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ईव्हीएम हॅक करण्यासाठीच मतमोजणी लांबवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निर्णय कायम! नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबरलाच लागणार असल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत आज महत्वाची सुनावणी पार पडली. २१ डिसेंबरपूर्वी निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली असून, कोर्टाने नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. हेही वाचा : निर्णय कायम! नगरपरिषद नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी