आणखी एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरावर छापा, मागवावं लागलं नोटा मोजायचं मशीन

कन्नौज – कन्नौज येथील अत्तर व्यापारी मोहम्मद याकूब यांच्या घरावर सुरू असलेल्या आयकर छाप्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा बाहेर आल्या आहेत. या छाप्यात मोहम्मद याकूब याच्या मंडईतील घरातील रुपयांची मोजणी संपली आहे. नोटा मोजण्याचे यंत्र घेऊन बँकेचे कर्मचारी त्यांच्या घरातून बाहेर पडले. बँक कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाच्या आवारातून सुमारे 4 ते 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात सोनेही जप्त करण्यात आले आहे. इन्कम टॅक्स टीम अजून तपास करत आहे.
अनेक शहरांमध्ये अत्तराचा व्यवसाय –
मोहम्मद मलिक याकूब मलिकचा धाकटा भाऊ आहे. अत्तराचा मुख्य व्यवसाय मोहम्मद मलिक यांचे दोन्ही मुलगे सांभाळतात. मोठा मुलगा मुंबईतील व्यवसाय पाहतो आणि धाकटा मुलगा फैजान कन्नौजमधील व्यवसाय पाहतो. फैजानचे सासचे लोकही कानपूरमधील अत्तर व्यवसायाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. 1886 मध्ये मोहम्मद आयुब आणि मोहम्मद याकूब यांनी स्वतःच्या नावाने एक फर्म स्थापन केली. मुख्यतः या लोकांनी पर्शियाच्या व्यापाऱ्यांसोबत शमामा बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता.
यापूर्वी पियुष जैनच्या घरावर छापा –
यापूर्वी इन्कम टॅक्स आणि डीजीजीआयने अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या कानपूर आणि कन्नौजसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. कानपूर आणि कन्नौजमधून मोठ्या प्रमाणात पैसा आणि सोने जप्त करण्यात आले आहे. एकूण किंमत 200 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. पीयूष जैन यांच्या घरातून सापडलेली रोकड आणि सोने कानपूर येथील स्टेट बँकेच्या तिजोरीत ठेवण्यात आले आहे.





