कॉसमॉस बँकेच्या माटुंगा शाखेचे नव्या ठिकाणी स्थलांतर; अद्ययावत सुविधा उपलब्ध
Updated On:

पुणे – कॉसमॉस बँकेच्या माटुंगा शाखेचे स्थलांतर नुकतेच माटुंगा पूर्व येथील भाऊ दाजी रस्त्यावरील पलई रेसिडेन्सी या प्रशस्त जागेत करण्यात आले. स्थलांतरित शाखेचे उद्घाटन बँकेचे संचालक श्री. सचिन आपटे यांच्या हस्ते तसेच अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक श्री. प्रवीणकुमार गांधी, संचालिका सौ. अनुश्री माळगावकर तसेच बँकेचे अधिकारी व सेवक उपस्थित होते.
माटुंगा स्थलांतरित शाखेत लॉकर्स व एटीएम सुविधेसह बँकेच्या सर्व अद्ययावत सेवा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यापूर्वी बँकेची शाखा माटुंगा पूर्व येथील भांडारकर रस्त्यावरील सुख कॅसल येथे पहिल्या मजल्यावर होती. ग्राहकांना सोयीचे व्हावे म्हणून शाखा तळमजल्यावर स्थलांतरित केली गेली आहे, असे सचिन आपटे यांनी सांगितले.





