कॉसमॉस बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

पुणे – सहकारी बँकींग क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणार्या कॉसमॉस को.ऑपरेटिव्ह या मल्टिस्टेट शेडयुल्ड बँकेची निवडणूक’सहकार निवडणूक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या मान्यतेनुसार, बिनविरोध झाल्याचे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय राऊत यांनी जाहीर केले. विद्यमान संचालक मंडळाची मुदत डिसेंबर 2024 अखेर संपत होती.
केंद्रीय सहकार निवडणूक प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडून दि. 13 सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार कॉसमॉस को.ऑपरेटीव्ह बँकेच्या सन 2024-2025 ते 2029-2030 या मुदतीकरिता संचालक मंडळाच्या निवडणूकीसाठी बँकेच्या सभासदांची विषेश सर्वसाधारण सभा व मतदान रविवार, दि. 15 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
सर्वसाधारण गटासाठी 10, अनुसूचित जाती जमाती 1 तसेच महिलांकरिता 2 जागा अशा एकूण 13 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. तथापि 13 जागांसाठी 13 उमेदवारांनीच अर्ज सादर केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलेले उमेदवार रसिका गुप्ता, सुरेखा जोशी, प्रविणकुमार गांधी, अजित गिजरे, सुब्रमणियम संथानम, घनष्यामभाई अमिन, अॅड. प्रल्हाद कोकरे, सचिन आपटे, सीए यशवंत कासार, अरविंद तावरे, बाळासाहेब साठे, अनुश्री माळगांवकर वरेखा पोकळे, हे आहेत.
मलिंद काळे यांच्या नेतृत्वाखाली पुनर्रचना –
माजी अध्यक्ष, सीए मिलिंद काळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नवीन संचालक मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. बदलत्या काळाला अनुसरून विद्यमान संचालक मंडळातील 6 संचालकांसह नवीन 7 संचालक घेऊन नवीन संचालक मंडळ तयार केले. या 13 संचालकांव्यतिरिक्त 25 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली, त्यामुळे बँकेची निवडणूकबिनविरोध करण्यात सीए काळे यांचा वाटा महत्वाचा ठरला.





