Cosmos Bank: 18 जानेवारी 2026 रोजी कॉसमॉस बँकेने ग्राहक सेवेची 120 वर्ष पूर्ण केली. वर्धापनदिनाच्या निमित्ताने बँकेने एक अतिषय स्तुत्य उपक्रमाची सुरूवात केली. बँकेतर्फे चार अंध व्यक्तींना नियुक्तीची पत्रं बँकेचे अध्यक्ष अॅड. प्रल्हाद कोकरे यांच्या हस्ते तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे सीए दिलीप सातभाई यांच्या उपस्थितीत देण्यात आली. देवदान गायकवाड, अभिजित मोरे, पूजा घाडगे व प्रज्वल बिरे या अंध व्यक्तींची बँकेने ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर म्हणून नेमणूक केली. एमएस वर्ड, एक्सेल चाचणी तसेच मुलाखतीद्वारे या सर्वांची निवड करण्यात आली. बॅक ऑफिस तसेच मुख्य कार्यालयात या व्यक्तींना योग्य ते काम देण्यात येणार असून सर्व आवश्यक सुविधा व सॉटवेअर सपोर्ट देण्यात येणार आहे. सामाजिक जाणीवेच्या जबाबदारीने कॉसमॉस बँकेने हे महत्वाचे पाऊल उचलले असून सहकारी बँकीेंग क्षेत्रात एक चांगला पायंडा यानिमित्ताने पाडला आहे. बँकेच्या 120 वर्शाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच अंध व्यक्तींना अशी नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम बँकेने सुरू केला आहे. सदर उपक्रमाची माहिती देताना सीए काळे यांनी सांगितले की, ”दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून स्वत:च्या पायावर उभं रहाण्याची संधी या निमित्ताने बँकेने उपलब्ध करून दिली आहे. भविश्यातही अषाच प्रकारचे उपक्रम राबविले जातील. सहकारी बँकींग क्षेत्रात कॉसमॉस ही बहुधा पहिलीच सहकारी बँक असेल, ज्यांनी अंध व्यक्तींना सेवेत सामावून घेतले आहे”.