मुंबई : कोरोना व्हायरस किट केवळ डॉक्टरांच्या शिफारसींनुसार विकावेत, असे आदेश राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत, अशी माहिती सरकारच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली.
कोरोना व्हायरस साठा यांकडे एफडीएने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीपीई किट आणि आणि एन 15 मास्कची विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक किंमतीने करत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. केवळ डॉक्टरांच्या शिफारसींनुसारच पीपीई किट आणि मास्कची विक्री करावी, असे आदेश केमिस्टना देण्यात आले आहेत.
या किटचा साठा उत्पादन स्थळ आणि त्याची पुरवठा साखळीवर जाऊन तपासण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. अद्याप महाराष्ट्रात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. तरीही राज्य सरकार योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय उचलत आहे, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहेत.