बल्लारी – कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या बहिणीचे दिमाखात स्वागत करणाऱ्या एका पुणेकर मुलीचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल झालाय. कोरोनाला हरवणाऱ्या आपल्या बहिणीचे या मुलीने डान्सद्वारे केलेलं स्वागत सर्वांच्याच पसंतीस पडलंय.
अशातच आता थेट कोरोनाग्रस्तांच्याच डान्सचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडीओ कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील असल्याचं समजतंय.
एका नामांकित वृत्तसंस्थेने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये कोरोनाचे अलाक्षणिक रुग्ण फ्लॅश मॉब प्रकारचे नृत्य करताना दिसतायेत. विशेष म्हणजे डान्स करताना या रुग्णांनी कोरोनाबाबतची सर्व खबरदारी बाळगली आहे.
फ्लॅश मॉबमध्ये नृत्य करणारे सर्व रुग्ण सोशल डिस्टंसिंगचे पालन करत एकमेकांपासून अंतर ठेऊन नृत्य करत आहेत. तसेच सर्वानी आपल्या तोंडावर मास्क देखील लावलेला आहे.
व्हिडिओमधील कोरोनाग्रस्तांनी बॉलिवूड व प्रादेशिक गाण्यावर ठेका धरल्याचं दिसतंय.
#WATCH Karnataka: Asymptomatic #COVID19 positive patients organise a flash mob at a COVID care centre in Bellary where they are admitted. (19.07.2020) pic.twitter.com/30D6E4ESOV
— ANI (@ANI) July 20, 2020