नगर – जिल्ह्यात आज पुन्हा करोनाचे 12 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नगर शहरात दिवसभरात सात रुग्ण आढळून आले आहेत. लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 195 एवढी झाली असून, करोनाबाधितांची द्विशतकाकडे वाटचाल सुरु झाली आहे.
शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील 32 वर्षीय युवक करोनाबाधित झाला आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील 10 वर्षीय मुलगा व लालबाग (मुंबई) येथून पारनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे आलेली 28 वर्षीय महिला बाधित झाली आहे. संगमनेर शहरातील दोघांना करोनाची लागण झाली असून, कोल्हेवाडी रोड येथील 18 वर्षीय युवक व नवघरगल्ली येथील 32 वर्षीय तरुण बाधित झाला आहे. नगर शहरातील लालनगर, नेप्तीनाका केडगाव येथील 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्या रुग्णालयाकडून आलेल्या अहवाला पैकी सायंकाळी जिल्ह्यात आणखी 12 नवीन रुग्णांची भर पडली आहे, तर 61 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. माळीवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील चार महिला आणि एका पुरुषाचा यात समावेश. याशिवाय, मार्केट यार्ड येथील 37 वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे, तर केडगाव येथील 55 वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे.
तसेच शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील 60 वर्षीय व्यक्तीसह पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भांडूप (मुंबई) येथून शेवगाव येथे आलेल्या 55 वर्षीय पुरुष आणि 50 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या 195 झाली आहे. जिल्ह्यातील आठ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यांना आज डिस्चार्ज दिला. यात नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहुरी आणि पारनेर येथील हे रुग्ण आहेत.