चिंता वाढली : 4 सिंहांमध्ये आढळला करोनाचा घातक ‘डेल्टा व्हेरियंट’

चेन्नई – देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप आटोक्यात आलेली नाही. तोच करोनाच्या घातक व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. या व्हेरियंटचं नाव डेल्टा व्हेरियंट आहे. हा व्हेरियंट आता प्राण्यांमध्ये आढळून आला आहे.

करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे. त्यातच डेल्ट व्हेरियंट घातक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सुरुवातीला करोना व्हायरस प्राण्यांमध्ये आढळून आला होता. मात्र आता करोनाचा डेल्टा व्हेरियंट जणावरांपर्यंत पोहोचला आहे.

तामिळनाडूच्या वंडालूर येथील अरिनगर अन्न प्राणीसंग्रहालयातील चार करोनाबाधित सिंहांच्या  शरिरात हा व्हेरियंट आढळून आला आहे. सिंहांमध्ये आढळून आलेल्या विषाणूच्या जणूकीय संरचना तपासणीनंतर ही बाब समोर आली आहे.

भोपाळच्या आयसीएआर-नॅशनल उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानाकडे 29 मे रोजी सात सिंहांचे नमूने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. यातील चार सिंहांमध्ये करोनाचा पँगोलिन लिनियोज बी.1.617.2 व्हेरियंट आढळून आल्याचं  संस्थेच्या उपसंचालकांनी एक निवेदन जारी करून म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याला डेल्टा व्हेरियंट नाव दिलं आहे. करोनाचा हा व्हेरियंट अधिक घातक आणि वेगानं पसरणारा आहे.

याच महिन्यात ९ वर्षांची सिंहीन आणि १२ वर्षांचा पद्मनाथन यांचा मृत्यू झाला होता. तर ९ सिंहांवर करोनाचे उपचार सुरू आहेत.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.