मुंबई – करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ब्रिटनची मोठी कंपनी अस्त्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा अनेक देश आपत्कालीन वापर करत आहे. पण, ही लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे समोर येऊ लागल्याने युरोपच्याच सहा देशांनी या लसीचा वापर करणे थांबविले आहे. परंतु, कंपनीने अस्त्राझेनेका कंपनीने सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
अस्त्राझेनेका कंपनीने म्हंटले की, कोविड-१९ प्रतिबंधक लसीद्वारे लसीकरण केलेल्या लोकांच्या रक्तात गाठी निर्माण होण्याचा धोका वाढल्याचा काही पुरावा मिळालेला नाही. आम्ही आणि युरोपियन आरोग्य अधिकाऱ्यांनी अतिरिक्त चाचण्या घेतल्या आहेत आणि चाचण्यांमध्ये कशाचाही चिंता करण्याचे कारण दिसून आले नाही. मासिक सुरक्षा अहवाल पुढील आठवड्यात एएमए वेबसाइटवर नागरिकांसाठी प्रकाशित केला जाईल.
ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेली अस्त्राझेनेका लस युरोपियन युनियन आणि बर्याच देशांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत केली गेली आहे. परंतु अद्याप यू.एस.ने तिला मान्यता दिलेली नाही.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे या घटना घडल्या आहेत असे कोणतेही संकेत दिसत नाहीत, असे युरोपियन मेडिसीन एजन्सीने सांगितले आहे.