नारायणगावातील कोरोना योद्धा….संजु भोर

Updated On:

नारायणगाव : कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता लोकांच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर बेड उपलब्ध होण्यापासून उपचार पूर्ण होईपर्यंत रुग्णाचा व कुटुंबाचा जीव टांगणीला लागलेला असतो. अनेक वेळा अशा कोरोनाबाधित व्यक्तीस नातेवाईकांनाही भेटण्यास प्रतिबंध केला जातो. त्यातच दुर्दैवाने एखादी कोरोनाबाधित व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. अशा अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी कुटुंबातील नातेवाईकांवर अनेक बंधने येतात.

परंतु नारायणगाव मधील एक कोरोना योद्धा संजय भागुजी भोर (वय-38) याने आजपर्यंत जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील 332 कोरोना मृत रुग्णांवर विनामोबदला अंत्यसंस्कार करण्याचे काम केले आहे.

संजय भोर हा एक सर्वसामान्य कुटुंबातील असून ॲम्बुलन्स वर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे. घरी आई, बहिण व पत्नी असा परिवार आहे. समाज कार्याची प्रचंड आवड असलेला राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरपंच बाबुभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संजू भोर स्वतःचा जीव धोक्यात घालून नातेवाईकांच्या भावना सांभाळत कोरोना मृत रुग्णांना स्वतःच व्यवस्थित पॅकींग करून अंत्यसंस्काराची कामे पार पाडतो. समाजाचे आपण देणं लागतो ही भावना मनामध्ये ठासून भरलेली.

गेल्या एका वर्षापासून 24 तास नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असून घरी जातो ते फक्त अंघोळीसाठी. कोरोना मृत रुग्णांवरील अंत्यसंस्कार पासून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची ने-आण करणे, त्यांना जेवण, पाणी, गोळ्या देणे, ऑक्सिजनच्या टाक्या, रुग्णांची संपूर्ण देखभाल, रुग्णालयाची साफसफाई करून रुग्णसेवेची कामे संजू भोर करीत असतो. या कामाचा तो एक रुपयाही मोबदला घेत नाही.

आणखी संबंधित बातम्या

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

2026-09-27 07:56:56

Narayangaon : विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांनी जिंकली नागरिकांची मने

Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा हटविला

2026-09-25 07:59:14

Pune District : नारायणगावच्या प्रवेशद्वारावरील कचरा हटविला

Narayangaon : द्राक्ष, मनुके व सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंधांची गरज

2026-09-25 07:54:50

Narayangaon : द्राक्ष, मनुके व सुकविलेल्या फळांच्या आयातीवर कठोर निर्बंधांची गरज

Pune District : मीना नदीकाठचा कचरा हटविला

2026-09-23 08:21:05

Pune District : मीना नदीकाठचा कचरा हटविला

Narayangaon : कुबेर अंगण गणेश मंडळाचा ग्रामवैभव देखावा

2026-09-19 08:24:01

Narayangaon : कुबेर अंगण गणेश मंडळाचा ग्रामवैभव देखावा