मुंबई – राज्यात दिवसेंदिवस नवीन करोनाबाधित रूग्णांच्या संख्येत भर पडत आहे. अनेक शहरांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी अंशत: लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. राज्यात आज 15051 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. काल 16620 करोनाबाधितांची नोंद झाली होती. राज्यात आज 15051 करोना बाधित रूग्णांची वाढ झाली असून 10671 करोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. तर 48 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 2144743 रूग्ण बरे होऊन रूग्णालयातून घरी परतले आहेत. सध्या राज्यात एकूण 130547 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.07% झाले आहे.