उल्हासनगरमध्ये बालसुधारगृहतात करोनाचा शिरकाव; 14 मुलं बाधित
Updated On:

उल्हासनगर – राज्यासह मुंबई शहरात करोनाची लाट कमी होत जात असताना आज उल्हासनगरमधील बालसुधारगृहतात जवळपास १४ मुलांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंतेत थोडी भर पडली आहे.
या १४ मुलांपैकी ४ अपंग मुलांचाही समावेश आहे. महापालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये संबंधित मुले करोना बाधित आढळली आहे. संबंधित सर्व करोनाबाधित मुलांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित सर्व मुले 12 ते 17 वयोगटातील असल्याची माहिती बालसुधारगृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यानंतर आता बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांची देखील करोना चाचणी करण्यात आली असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.





