मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी काम करणाऱ्या 16 कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. आव्हाड यांच्या निवासस्थानातील स्वच्छता कर्मचारी, स्वयंपाकी आणि अन्य कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे.
या 16 जणांमध्ये आव्हाड यांच्या निवासस्थानी नेमलेल्या पाच पोलीस हवालदारांचाही समावेश आहे. एका करोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी सोमवारी स्वत:ला घरातच विलगीकरणात ठेवले आहे. स्वत:ला विलगीकरणात ठेवणारे ते राज्यातील पहिले मंत्री आहेत.