कलेढोण – कलेढोण, ता. खटाव येथील साळुंखे मळ्यातील करोनाबाधित दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील नऊ व अन्य एक, अशा दहा जणांचा कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने कलेढोणकरांची चिंता मिटली आहे. मुंबईतून कलेढोण येथे 28 मे रोजी आलेले दाम्पत्य होम क्वारंटाइनमध्ये असताना त्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यांच्या संपर्कात आलेल्या वाहनचालक, घरातील इतर सदस्यांसह दहा जणांना इन्स्टिट्युटशनल क्वारंटाइन करण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट काल (दि. 2) रात्री उशिरा निगेटिव्ह आले.