नवी दिल्ली – देशभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसने राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला आहे. यामुळे राष्ट्रपती भवनातील १२५ कुटुंबाना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपती भवनातील १२५ कुटुंबांना सक्तीने क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
One case has been found there (in Rashtrapati Bhavan): Satyendar Jain, Delhi Health Minister https://t.co/X9GknGeXHS pic.twitter.com/KEwi8plRol
— ANI (@ANI) April 21, 2020
दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयानी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील करोनाबाधितांची संख्या १८ हजारांवर गेली आहे. तर ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ३२५२ रुग्ण बरे झाले आहे.