ब्रिटनमध्ये आढळला करोनाचा आणखी एक नवा स्ट्रेन; जर्मनीने ब्रिटनहून येणाऱ्या लोकांना घातली बंदी

लंडन – ब्रिटनमध्ये करोनाच्या ट्रिपल म्यूटेशनची चर्चा सुरू झाली आहे. ही माहिती देताना त्या देशाचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक म्हणाले की, ट्रिपल म्युटंट करोना व्हायरस प्रकार पहिल्यांदा यॉर्कशायरमध्ये सापडला होता. याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहेत. या नवीन प्रकाराबद्दल असे सांगितले जात आहे की, हे करोनाच्या पूर्वीच्या रूपांपेक्षा अधिक धोकादायक आणि संक्रमित करणारे आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, पब्लिक हेल्थ इंग्लंडने शुक्रवारी सांगितले की, करोनाच्या नवीन स्ट्रेनचे नाव VUI-21MAY-01 आहे, याचा सर्वप्रथम खुलासा एप्रिलमध्ये केला गेला. देशभरातून VUI-21MAY-01 चे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. आतापर्यंत यॉर्कशायर आणि हंबरमध्ये नवीन स्ट्रेनच्या 49 केसेस मिळाल्या आहेत.
जर्मनीतील मंत्र्यांनी म्हटले आहे की, नवीन केसेसचा प्रसार रोखण्यासाठी ते कठोर पावले उचलण्यास मागे पुढे पाहाणार नाहीत. नवीन व्हेरिएंटच्या बातमीनंतर जर्मनीने ब्रिटनहून त्यांच्या देशात येणाऱ्या लोकांना बंदी घातली आहे. नवीन नियमांनुसार, रविवार, 23 मे रोजी मध्यरात्रीपासून, ग्रेट ब्रिटन आणि उत्तर आयर्लंडहून जर्मनीकडे जाणारे लोकं जर जर्मन नागरिक किंवा रहिवासी असतील तरच ते देशात प्रवेश करू शकतात.
देशात सुरू झालेल्या पहिल्या लसीकरण मोहिमेते 21 मे पर्यंत 37.73 दशलक्ष लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचवेळी 22.07 दशलक्ष लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.





