पुणे – करोनाबाधित मृतांमध्ये अन्य आजार असलेल्यांची संख्या जास्त आहे, परंतु त्याबरोबरच “सिनियर सिटीझन्स’ची संख्याही लक्षणीय आहे. बुधवारी मृत्यू पावलेल्यांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक म्हणजे 16 पैकी 12 आहे.
“मल्टिपल डिसीज’ म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे रोग याशिवाय अन्य व्याधी असलेल्यांना जर करोनाची बाधा झाली तर त्यांची प्रकृती गंभीर होऊ शकते. दिवसभरात मृत पावलेल्या 16 बाधितांमधील तीन रुग्ण 80 वयापेक्षा जास्त होते. 87, 86, 80 असे त्यांचे वय आहे.
तर 75 वयाचे चार, वय वर्षे 72 असलेले दोन, 68,67 आणि 65 वयाचे तीन, 58 वयाचे दोन आणि 47 वयाच्या एका रुग्णाचा समावेश आहे. बुधवारी मृत पावलेल्यांमध्ये 27 वर्षीय तरुणाचाही समावेश आहे.